अवघ्या २५१ रुपयात मिळणार स्मार्टफोन

freedom
मुंबई : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स लाँच करणार असून २५१ रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे.

या स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१चे लाँचिंग केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर करणार आहेत. जगातील सर्वात स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे. ४ इंचची डिस्प्ले, १.३ गीगाहर्ट्ज कोअर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी टोटल स्टोरेज स्पेस, ३.२ मेगापिक्सल कॅमेरा आणि १४५० एमएएच बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्ये आहे. १८ फेब्रुवारीपासून या फोनची बुकिंग सुरू होणार आहे. या फोनचे नाव फ्रीडम २५१ आहे.

Leave a Comment