मल्ल्यांची युनायटेड ब्रेवरीज ‘डिफॉल्टर’ म्हणून जाहीर

vijay-mallya
नवी दिल्ली – उद्योगपती विजय माल्ल्या यांच्या बुडीत युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग (युबीएचएल) ला जाणूनबुजून चूक करणारी म्हणजे ‘विलफूल डिफॉल्टर’ म्हणून पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) जाहीर केले आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

११ फेबुवारीला पीएनबीने पाठविलेल्या पत्रामध्ये कंपनीला डिफॉल्टर म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती युबीएचएलने मुंबई शेअरबाजाराला पाठविलेल्या सूचनेमध्ये केली आहे. पीएनबीचे पत्र आम्हाला सोमवारी उपलब्ध झाल्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वकिलांशी चर्चा सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मल्ल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि त्यांची होल्डिंग कंपनी युनायटेड ब्रेवरीजला याच्या अगोदर भारतीय स्टेट बँकेने जाणूनबुजून चूक करणारे म्हणून घोषित केले आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँकांनी मुंबईमध्ये किंगफिशर हाऊसचा १७ मार्चला लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. किंगफिशर एअरलाइन्सकडून ९,९६३ कोटी रुपयांच्या थकित कर्जापैकी काही वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment