भविष्यात पाण्यांखाली असेल मानवी वस्ती

life
आगामी शतकात मानवी जीवन पूर्णपणे बदलणार असल्याचे स्मार्ट थिंग फ्यूचर लिव्हींग नावाच्या अहवालात नमूद केले गेले असून हा अहवाल बनविताना विविध क्षेत्रातील तज्ञांची मते आणि विचार लक्षात घेतले गेले आहेत असे समजते.

या अहवालात पृथ्वीवर आणखी १०० वर्षांनी मानवी जीवन कसे असेल याचे चित्र स्पष्ट केले गेले आहे. त्यानुसार जमिनीच्या कमतरतेमुळे माणसे पाण्यात राहतील व सुटी घालविण्यासाठी चंद्रावर अथवा मंगळावर जाऊ शकतील. २११६ सालापर्यंत पृथ्वीवर फक्त गगगचुंबी इमारतीच असतील व समुद्रातही बबल सिटी उभारल्या जातील. त्यात महाकाय बबलमध्ये घरे, शाळा, ऑफिसे, कार्यालये, पार्क अशा सर्व सुविधा असतील. या शहरांसाठी समुद्रातल्या पाण्यापासूनच ऑक्सिजन तयार करण्याची सुविधाही असेल.

याच काळात माणसांकडे त्यांची वैयक्तीक ड्रोन असतील. माणसे घरासह हिंडू फिरू शकतील. किरकोळ आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये न जाता घरातच चाचण्या करता येतील तसेच फर्निचरपासून ते आपल्या आवडत्या पदार्थांपर्यंत सर्व थ्रीडी प्रिटर्सच्या सहाय्याने बनविता येईल. रोज कार्यालयात जाऊन काम करण्याची कटकट राहणार नाही तर घरात बसूनच काम करता येईल असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment