२४ फेब्रुवारीला लाँच होणार शिओमी एमआय ५

xaiomi
नवी दिल्ली- २४ फेब्रुवारीला शिओमीचा नवा फ्लॅगशिप मोबाइल लाँच होणार असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष ह्युगो बर्रा यांनी म्हटले आहे. एका शानदार सोहळ्यात २४ फेब्रुवारी रोजी या फोनचे लाँचिंग होईल.

या कार्यक्रमाला सामान्य लोकांनाही उपस्थित राहता यावे यासाठी तिकीटांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एमआय ५ हा शिओमी कंपनीचा सर्वात बहुप्रतिक्षित फोन समजला जात आहे. सोनेरी, काळा, पांढरा आणि गुलाबी रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.

स्नॅपड्रॅगन ८२० एसओसी, १६ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ही या फोनची वैशिष्ट्ये असणार आहेत. २०,००० रुपये किंमत असलेला हा फोन लिनोव्हो आणि मायक्रोमॅक्सच्या फ्लॅगशिप मोबाइलला टक्कर देईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वर्षभरात शिओमीचे भारतात ८-१० कोटी मोबाइल विक्रीचे लक्ष्य आहे. हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे २४ फेब्रुवारीलाच समजेल.

Leave a Comment