दीड लाख पेंग्विन महाकाय हिमकडा कोसळून मृत्युमुखी

penguin
अंटार्क्टिका – गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल दीड लाख पेंग्विन अंटार्क्टिका प्रदेशात विशाल हिमकडा कोसळून मृत्युमुखी पडले आहेत. ही धक्कादायकबाब शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्ये उजेडात आली आहे. शास्त्रज्ञांनी इटलीची राजधानी रोम शहराएवढा महाकाय हिमनग एकावेळी कोसळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. नैसर्गिक आपत्ती अशीच राहिली तर पुढील २० वर्षांमध्ये एडिले पेंग्विन प्रजाती नष्ट होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथील वातावरण बदल केंद्राने पेंग्विनच्या कमी झालेल्या संख्येबाबत अध्ययन केले. यामध्ये अंटार्क्टिका प्रदेशातील १ लाख ६० हजार एडिले पेंग्विन होते. मात्र आता ही संख्या केवळ १० हजार झाली असल्याचे निदर्शनास आले. नैसर्गिक आपत्ती अशीच राहिली तर पुढील २० वर्षात एडिले पेंग्विन प्रजाती नष्ट होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. २०१०मध्ये बी०९बी नावाने ओळखला जाणारा हिमनग अंटार्क्टिकामध्ये अडकला होता. त्यामुळे पेंग्विन पक्षाला अन्नासाठी भटकंती करण्यात अडथळे आले. उपासमारीमुळे अनेक पेंग्विनचा मृत्यू झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment