‘व्हॅलेंटाईन डे’ला झाली १५ हजार कोटींची उलाढाल!

valentine-day
मुंबई : पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला व्हॅलेंटाईन डे भारतातदेखील साजरा करणारे लोक कमी नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात हा दिवस अमेरिकेपेक्षा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.

भारतात मात्र यादिवशी प्रेम व्यक्त करणा-यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गिफ्ट देणा-यांचे प्रमाण भारतात देखील मोठे आहे. अमेरिकेत आता गिफ्टवर जास्त खर्च केला जात नाही. ही माहिती एका वेबसाईटने केलेल्या सर्वेमधून समोर आली आहे.वेबसाईटने भारतात केलेल्या सर्वेनुसार यंदा गिफ्ट देणा-यांची संख्या २० टक्कयांनी वाढली आहे.

या सात दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये व्यवहारांची रेलचेल पाहायला मिळाली. लोकांनी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. वेबसाईटच्या मते महिलांपेक्षा पुरुष जास्त खर्च करतात. जॉब करणा-या लोकांनी १ हजार पासून ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. तर कॉलेजमध्ये शिकणा-या तरुणांनी ५०० पासून ते १० हजार रुपये खर्च केले. मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बाजारात १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली तर या वर्षी जवळपास १५ हजार कोटींची उलाढाल झाली असल्याची शक्यता आहे.

Leave a Comment