बिंदीची किंमत ५ हजार रूपये

bindi
देशात सध्या वेगाने फोफावत असलेल्या ऑनलाईन मार्केटमध्ये आता बिंदी खरेदीसाठीची साईटही सामील झाली असून येथे १५० रूपयांपासून ते ५ हजारांहून अधिक किमतीच्या बिंद्या उर्फ टिकल्या उपलब्ध आहेत. बुक माय बिंदी डॉट कॉम या अरूणा भट यांनी सुरू केलेल्या साईटवर हजारो प्रकारची बिंदी डिझाईन्स उपलब्ध करून दिली गेली आहेत.

अरूणा भटट गेली १४ वर्षे या व्यवसायात आहेत. त्या सांगतात तीन महिन्यांपूर्वी त्यांनी १ कोटी रूपयांच्या फंडींगमधून हे स्टार्टअप सुरू केले तेव्हा सुरवातीला त्यांची चेष्टा व उपहास केला गेला मात्र आता या साईटला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. येथे परंपरागत टिकली मिळत नाही तर ते एक प्रकारचे आर्टवर्क आहे. या साईटवर बिंदीची १ लाख डिझाईन्स असून गेल्या १५ वर्षात त्यांनी एकही डिझाईन रिपिट केलेले नाही. २००८ साली त्यांची लिम्का बुकमध्येही नोंद झाली आहे.

ऑनलाईनवरच्या या बिंद्या दुकानातून नेण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत. सर्वसाधारण दुकानातून बिंदी पाकिटे ५ रूपयांपासून ५० रूपयांपर्यंत मिळतात तेथे या बिद्या मात्र १५० रूपयांना जोडी या दराने सुरू होतात. तरीही आजकाल बिंदी हा फॅशन आयकॉन बनू लागल्याने महाग बिंद्यांनाही चागंली मागणी आहे असे त्या सांगतात. भट यांच्या कारखान्यात १५ ते २० लोक काम करतात व त्यातील बहुसंख्य पुरूष आहेत.

Leave a Comment