महाराष्ट्रात आठ हजार कोटींची गुंतवणूक करणार महिंद्र अँड महिंद्र

mahindra
मुंबई – महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये येत्या सात वर्षांमध्ये करणार आहे. विस्तार योजनेचा भाग म्हणून ही गुंतवणूक करण्यात येणार असून ही गुंतवणूक महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये पायाभूत सुविधा देणे, उत्पादनांचा विकास करणे आणि वाहन निर्मितीची क्षमता वाढवणे यामध्ये करण्यात येणार असल्याचे सोमवारी कंपनीने जाहीर केले.

राज्य सरकारशी या संदर्भातील सामंजस्य करारही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या आहेत. महिंद्रचे महाराष्ट्रात चाकण, नाशिक, कांदिवली आणि इगतपुरी या चार ठिकाणी कारखाने आहेत. याखेरीज तेलंगणा आणि उत्तराखंड येथेही कंपनीचा प्रत्येकी एक कारखाना आहे.

Leave a Comment