व्हॅलेंटाईन डेनिमित्त बीएसएनएलची खास ऑफर

bsnl
मुंबई- व्हॅलेंटाईन डेनिमित्त तरुणांसाठी देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी बीएसएनएलने ऑफर आणली आहे. तरुणांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त २० एमबी डेटा फक्त २० रुपयांत उपलब्ध करुन द्यायचे बीएसएनएलने ठरवले आहे. ही ऑफर १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत असून प्रिपेड मोबाईल डेटावर १० टक्के अतिरिक्त डेटा या कालावधीत मिळणार आहे. त्याशिवाय एक दिवसाचा ४ रुपयांत २०एमबी डेटा लाँच केला आहे. त्यामुळे तरुणाई फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर जोडलेली राहील. बीएसएनएलचे ग्राहक मोबिलिटी संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, यंदा व्हॅलेंटाईन डेला ब्लॅक आऊट डेच्या बाहेर ठेवले आहे. सर्व मोबाईल धारकांना ही सवलत घेता येईल. त्याशिवाय नेटवर १३० एसएमएस (लघु संदेश) १२ रुपयांत, ३८५ एसएमएस ३१ रुपयांत आणि ८६० एसएमएस ५२ रुपयांत अशीही योजना आहे.

1 thought on “व्हॅलेंटाईन डेनिमित्त बीएसएनएलची खास ऑफर”

  1. bsnl चे ग्राहक प्रतिनिधि नीट समाधान कररक उत्तर देत नाए त्यामुळे आम्ही कोना जवळ समस्या माडायाच्या

Leave a Comment