उन्हाळ्यात रंगणार पेप्सी कोला मिनी पॅक वॉर

kola
यंदाच्या उन्हाळ्यात पेप्सी आणि कोला बनविणार्‍या पेप्सिको व कोका कोला कंपन्यांत नवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कंपन्या नवीन धोरणांसह बाजारात उतरायची तयारी करत असून आपल्या उत्पादनांचे छोटे कॅन त्या बाजारात आणत आहेत. गेले कांही दिवस या पेयांमुळे आरोग्याची हानी होत असल्याचा प्रचार होत असल्याने त्यांची विक्री सातत्याने घटत चालली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी छोटे पॅक बाजारात आणले जात असल्याचेही समजते.

पेप्सी १५० ते १८० मिलीलीटरचे पॅक बाजारात आणत आहे तर कोला १८० ते ३०० मिलीलीटरचे पॅक आणत आहे. या पॅकच्या किंमती कमी असतील. हे छोटे पॅक प्रामुख्याने ऑनलाईन मार्केट प्लेस व एअरलाईन्सना नजरेसमोर ठेवून आणले जात आहेत. पेप्सिकोचे उपाध्यक्ष विपुल प्रकाश यांनी मात्र ग्राहकांकडूनच छोट्या पॅकना अधिक मागणी येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले माय कॅन या योजनेअंतर्गत आम्ही प्रथम पेप्सी बाजारात आणत आहोत. त्यानंतर मिरींडा, माऊंडेन ड्यू ही बाकी उत्पादनेही छोट्या पॅकमधून दिली जातील.

कोकाकोला त्यांच्या छोट्या पॅकसाठी २० रूपये दर ठेवणार आहे तर पेप्सीचा दर असेल १५ रूपये. सध्या हेच दर २०० मिली साठी १२. ३०० मिली साठी १५ तर ६०० मिलीसाठी ३५ रूपये असे आहेत.

Leave a Comment