मोटोरोलाचा ९,९९९ किंमतीचा जी ३ विक्रीसाठी उपलब्ध

motorola
नवी दिल्ली- भारतीय बाजारात मोटोरोला २ च्या यशानंतर मोटो ३ जी हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन उपलब्ध झाला असून याची विक्री केवळ अॅमेझॉनवरच होणार आहे. या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. तसेच कंपनीची मोटो जी टर्बो एडिशनदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कसा आहे मोटोरोलाचा जी ३ – याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून यात १.४ गीएचझेडचा प्रोसेसर आणि १ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याचे ऑपरेटिंग सिस्टम अॅंड्रॉइड ५.१ बेस आहे. याचा रियर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि सेल्फी कॅमेरा५ मेगापिक्सलचा आहे. याची स्टोरेज क्षमता ८ जीबी आहे. तर याच्या बॅटरीची क्षमता २४७० एमएएच एवढी आहे.

Leave a Comment