देशात अॅमेझॉनची १९८० कोटीची गुंतवणूक

amazon
नवी दिल्ली – आपल्या भारतातील प्रकल्पांमध्ये १९८० कोटी रुपयांची गुंतवणूक ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने केली आहे. एक महिन्याच्या दरम्यान कंपनीकडून करण्यात आलेली ही दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक असून ही माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली आहे.

अॅमेझॉनच्या नवीन गुंतवणुकीबाबत माहिती उपलब्ध झाली असून डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने १६९६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अॅमेझॉनचे संस्थापक बेजोस यांनी भारत दौ-यावर आल्यानंतर आपल्या अनेक योजनांची माहिती जाहीर केली होती. अॅमेझॉन २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ताज्या गुंतवणुकीचा वापर अॅमेझॉन गोदाम, वाहतूक आणि विपणन यासाठी करणार आहे. कंपनीने जानेवारी २०१५पासून आतापर्यंत ६७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment