स्वस्त झाला वनप्लस २

one-plus
मुंबई: ‘वनपल्स’ने नुकत्याच लाँच केलेल्या वनप्लस २ स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली असून हा स्मार्टफोन आता ३४९ डॉलर म्हणजेच २३,९९९ रुपयांना मिळणार आहे. जेव्हा हा फोन लाँच झाला तेव्हा त्याच्या ६४ जीबी मॉडेलची किंमत ३८९ डॉलर होती.

लवकर भारतातही या स्मार्टफोनमध्ये करण्यात आलेली कपात लागू करण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. भारतात वनप्लस २च्या १६ जीबी मॉडेलची किंमत रु. २२,९९९ आहे तर ६४ जीबी मॉडेलची किंमत २४,९९९ रु. आहे. कंपनीच्या मते, या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट-स्कॅनर उपलब्ध आहे. तसेच वनप्लस २चा फिंगरप्रिंट-स्कॅनर आयफोनच्या टचपेक्षाही चांगला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ज्यामध्ये आपण पाच फिंगरप्रिट-स्कॅनर एकाच वेळेस सेव्ह करु शकता.

Leave a Comment