सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ ठरले सुंदर पिचाई

sunder-pichai
न्यूयॉर्क : अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे मूळ भारतीय वंशाचे ‘गूगल’चे सीईओ सुंदर पिचाई बनले आहेत. सुंदर पिचाई यांनी भल्याभल्यांना आपल्या बुद्धीकौशल्याने भूरळ पाडल्यामुळे, ‘अल्फाबेट इंट’ने त्यांना १९९ मिलियन डॉलरचे (म्हणजेच जवळपास १३०० करोड रुपये) काही स्टॉक शेअर्स दिले आहेत.

३ फेब्रवारीला कंपनीने पिचाई यांना हे पॅकेज दिले आहे. परंतु या शेअर्ससोबत अल्फाबेट इंटने काही अटी समोर ठेवल्या आहेत. २०१९ पर्यंत पिचाई हे गूगलला आपली सेवा देणार आहेत, तेव्हापर्यंतच त्यांना या पॅकेजचा फायदा मिळेल. सुंदर पिचाई यांना सध्या गूगल ३१० करोड रुपये वार्षिक पॅकेज देत आहे. कंपनीचे सीईओ बनल्यानंतर पिचाई यांना मिळणारा हा पहिलाच अॅवॉर्ड ठरला आहे.

Leave a Comment