भाज्या; पोषण द्रव्यांचे भांडार

vegetables
भाज्या आणि फळे हे अनेक प्रकारच्या पोषण द्रव्यांचे भांडार असते. भाज्या न खाणार्‍यांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की त्यांच्या जीवनातले आरोग्याचे अनेक प्रश्‍न भाज्या न खाण्यामुळे निर्माण झालेले असतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या असल्या पाहिजेत आणि त्या भाज्यासुध्दा आपण घरात शिजवून खाल्ल्या पाहिजेत. बाजारात सध्या अनेक प्रकारच्या तयार भाज्या मिळायला लागल्या आहेत. त्या भाज्यांमुळे गृहिणींचा घरी भाज्या शिजवण्याचा त्रास कमी होतो हे खरे असले तरी अशा तयार भाज्यांमध्ये पोषणद्रव्यांचा अभाव असतो. त्यामुळे अशा प्रोसेस केलेल्या भाज्या खाऊनसुध्दा काही विकार जडण्याची शक्यता असते.

प्रोसेस्ड् फळे आणि भाज्या खाल्ल्याने खाल्याचे समाधान लाभते परंतु काही सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाहीत आणि त्यामुळे खाणे झाल्यानंतरही थोड्याच वेळात भूक लागल्याची भावना होते. ही भावना त्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या अभावामुळे निर्माण होत असते. भाज्या शिजवून किंवा शक्य तो कच्च्या खाल्ल्या तर त्यातून ब जीवनसत्त्व मुबलकपणे प्राप्त होते. या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाला तर माणसाला ताजेतवाने वाटत नाही. सतत थकल्याची भावना वाढत राहते.

आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारकशक्ती फार प्रभावी असते आणि ती आपल्याला अनेक आजारांपासून वाचवत असते. परंतु आपल्या खाण्यात भाज्या भरपूर नसतील तर ही रोगप्रतिकारशक्ती मंदावते आणि माणूस सतत कसल्या ना कसल्या आजाराने त्रस्त राहतो. म्हणून भाज्या भरपूर खाल्या पाहिजेत. भाज्या न खाण्याच्या सवयीमुळे अनेक प्रकारचे त्वचाविकारसुध्दा उद्भवत असतात. त्याशिवाय आपल्याला अन्य काही अन्नातूनसुध्दा जीवनसत्त्वे मिळतात मात्र ही जीवनसत्त्वे शरीरात शोषून घेण्यासाठी भाज्या खाणे आवश्यक असते. याचा अर्थ भाज्या खाल्ल्याने इतर खाद्य पदार्थांतील जीवनसत्त्वेही शरीराला प्राप्त होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment