इसिसविरोधात गुगलचा यल्गार

isis
न्यूयॉर्क- आता जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगलने जगभरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात यल्गार पुकारला असुन आता गुगलवर तुम्ही इसिस असे टाकल्यास तुम्हाला दहशतवादविरोधातील माहितीच दिसून येईल. गुगलने हे उचलले पाऊल तुमच्या माहितीच्या अधिकारावर अतिक्रमण नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी आणि जगातील शांततेसाठी आहे.

सध्या इसिस ५० हजाराहून अधिक ट्विटर अकांऊटसवरुन आपला प्रचार करत असल्याचा संशय आहे. सोशल मिडीया आणि इंटरनेटचा आपल्या प्रचारासाठी इसिस अतिशय प्रभावी वापर करत असल्याने फेसबुक, ट्विटर आणि गुगलने एकत्र येत यावर प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment