लाव्हाचा ‘एक्स ३’ स्मार्टफोन लाँच

lava
नवी दिल्ली : ‘एक्स ३’ हा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘लाव्हा’ने लाँच केला असून या फोनची किंमत ६४९९ रूपये असून, ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘ऍमेझॉन’वर हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे.

कसा आहे ‘लाव्हा एक्स३’: यात ५ इंचाचा एचडी डिस्प्ले ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१२८० पिक्सल आहे. याचे ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप बेस आहे. याचा प्रोसेसर १.३ गीगाहर्टज् क्वॉडकोर मीडियाटेकचा आहे. याचे रॅम २ जीबी असून याची स्टोअरेज क्षमता ८ जीबीची आहे. याचा रियर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता २५०० एमएएच एवढी आहे. यात ३जी, ब्ल्यूटय़ूथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रोयूएसबी अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.