आता बार्बी नाही तर हिजार्बी

barbie
जगातील लहान मुलांनामध्ये खास आरक्षण असलेल्या बार्बी डॉलला आपण अनेक रूपात पहिले आहे. ऑफिसमध्ये जाणारी, डॉक्टर, पोलीस आणि स्वयंपाक करणारी बार्बी आपण पाहिली आहे. पण आता आपल्याला एका नव्या रुपात बार्बी पहायला मिळणार आहे. या बार्बीचे नाव हिजार्बी असे आहे आणि नावाप्रमाणेच ही बार्बी आपल्याला हिजाब घातलेली पाहायला मिळणार आहे.

पण लक्षात असू द्या, बार्बी डॉल बनवणाऱ्या कंपनीशी या हिजार्बीचा काडीमात्र संबंध नाही. हनिफा अॅडम असे या २४ वर्षीय महिलेचे नाव आहे. हिजाब परिधान केलेल्या बार्बीची खरेदी करण्याची संधी अमेरिका किंवा ब्रिटनच्या बाजारपेठेतून मिळू शकेल. कारण अशी हिजाब धारण केलेली बार्बी या देशांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाहुली ९.९९ पौंडला (सुमारे ९८३ रुपये) खरेदी करता येऊ शकते. ब्रिटनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना मला बार्बीचे रुपडे पालटावे, अशी कल्पना सुचली. त्यानुसार हिजार्बीचे रुपडे ठरवण्यासाठी त्याच्या डिझाइनवर तीन महिने काम केले.

त्यानंतर कुठे हिजार्बी साकारली; परंतु त्याअगोदर मला ब्रिटनमधून नायजेरियाला जावे लागले. तेथे मी काही मॉलशी चर्चा केली. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला आहे. माझ्या बाहुलीला चांगला प्रतिसाद मिळेल. कारण मुली आणि पालक नक्कीच सौंदर्याच्या बदललेल्या परिभाषेला स्वीकारतील, असा विश्वास हनिफाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment