
चीनी स्मार्टफोन कंपनी झोपो ने त्यांचा नवा स्मार्टफोन झोपो हिरो वन नावाने भारतीय बाजारात लाँच केला असून हा बजेट स्मार्टफोन आहे. लवकरच तो ऑनलाईन आणि ऑफ लाईन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी दाखल होत आहे. या फोनची किमत आहे १२ हजार रूपये.
झोपोचा हिरो वन स्मार्टफोन लाँच
हिरो वन हा ड्युअल सिम स्मार्टफोन असून त्याला अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस दिली गेली आहे. फोनला ५ इंची फुल एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. १३.२ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी रिमुव्हेबल नाही. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी ऑप्शन्स आहेत. हा फोन काळा व पांढर्या रंगात उपलब्ध आहे.
