
मुंबई : आपला नवा स्मार्टफोन ‘बिंगो २१’ इनफोकसने लॉन्च केला असून याची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. स्नॅपडील या ऑनलाईन वेबसाईटसह इनफोकस कंपनीच्या वेबासाईटवर लिस्ट केला आहे. ११ तारखेपासून विक्री सुरु होणार आहे, तर स्मार्टफोन खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.
इनफोकसचा ‘बिंगो २१’ अवघ्या ५,४९९ रुपयात
बिंगो २१ या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम आहे. ४.५ इंचाचा ८५०×४८० पिक्सल रिझॉल्युशन असलेला डिस्प्ले, २ जीबी रॅम, १.५GHz क्वाड-कोर प्रोसेसरही देण्यात आला आहे. ऑटोफोकस रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे, तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये ४जी, वायफाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी देण्यात आले आहेत. तर २३००mAh क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे.
