१५ मार्चला लॉंच आयफोन ५एसई आणि आयपॅड एअर ३

iphone
मुंबई – या वर्षातील पहिला कार्यक्रम १५ मार्चला अॅपल ही मोबाईल उत्पादक कंपनी करणार असून ज्यात ४ इंचाचा आयफोन ५ एसई आणि आयपॅड एअर ३ लॉंच करणार आहे. या दोन उत्पादनासोबतच अॅपल वॉचचे नवे मॉडेल देखील लॉंच केले जाऊ शकते.

आयफोन ५एसईचे हार्डवेअर आणि डिझाइन प्रोफाइल आयफोन ६एस सारखेच आहेत. त्याचबरोबर यात ए९ प्रोसेसर आणि एम९ असणार आहे. या फोनमध्ये व्हर्चुअल वोईस प्रोग्राम सिरीजदेखील असणार आहे. आयफोन ५एसईमध्ये १६ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केले जाणार आहे. या दोन्ही फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा आयसाइट रियर आणि ५ मेगापिक्सलचा फेसटाइम फ्रंट कॅमरा असणार आहे. या नव्या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ३डी टच फीचर देखील असणार आहे.

त्याचबरोबर नव्या आयपॅड एअर ३ मध्ये ४ जीबी रॅम असणार आहे. नव्या आयपॅडमध्ये जुन्या आयपॅडच्या तुलनेत अधिक क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले ९.७ इंचाचा देण्यात आला आहे.

Leave a Comment