एक लिटरमध्ये १०० किलोमीटर धावणार इओलॅब

renault
नवी दिल्ली – ऑटो एक्स्पो २०१६मध्ये रेनोने १ लिटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणाऱ्या कारची झलक दाखवली. इओलॅब असे या गाडीचे नाव असून ती एक हायब्रीड कार आहे. ही एक काल्पनिक कथा नसून ते २०२२मध्ये प्रत्यक्षात अवतरेल असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरसोबत पेट्रोल इंजिन असून हे इंजिन ६० किलोमीटर पर्यंत विना उत्सर्जन काम करते. या गाडीचे वजन १ टन आहे. कंपनीने या गाडीच्या किंमती बाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही.

Leave a Comment