
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये टाटाची सबसिडरी कंपनी जग्वार लँडरोव्हर ने त्यांची नवी एक्स ई सेदान लाँच केली असून या मॉडेलसाठी बॉलीवूड अभिनेत्री कटरिना कैफ ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडली गेली आहे. महिन्यापूर्वीच या कारचे बुकींग देशभरातील सेंटर्सवर सुरू झाले असून कारची किमत आहे ३९.५ लाख रूपये. टाटा जग्वार लँडरोव्हरची ही एंट्री लेव्हल कार आहे.
स्टनिंग जग्वार एक्सई साठी कटरिना ब्रँड अँबेसिडर
संपूर्णपणे नवीन अॅल्युमिनियम प्लॅटफॉर्मवर ही कार बनविली गेली असल्याने ती वजनाला हलकी आहे तसेच इंधन बचत करणारीही आहे. कारमध्ये अत्याधुनिक फिचर्स आहेत. ८ इंचाचा टच स्क्रीन, एलईडी डे टाईम रनिंग लाईन, सनरूफ, रिव्हर्स कॅमेरा तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज अशी फिचर्स आहेत. इंडियन मार्केटमधील मोस्ट अफोर्डेबल कार म्हणून हे मॉडेल प्रसिद्ध झाले आहे.
