आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस

it
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला नव्या वर्षात सुगीचे दिवस आले असून अधिकाधिक कंपन्या आता डिजिटायझेशनवर भर देत असल्यामुळेच आता आयटी क्षेत्रात या वर्षात २.५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

आयटी क्षेत्रात गेल्यावर्षी रोजगाराच्या संख्येत सरासरी १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, आता यंदाच्या वर्षी हीच वाढ तब्बल १४ ते १६ टक्के इतकी होण्याची शक्यता आहे. कामगारांची भरती करणारी कंपनी टीमलीझ सव्र्हिसेसच्या मते, चालू वर्षात आयटी कंपन्या डिजिटायझेशन करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. कंपन्यांकडून डिजिटायझेशनवर अधिक भर दिला जात असल्याने सुशिक्षित आणि सॉफ्टवेअर कुशल तरुणांना नियुक्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच आता आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामगारांची भरती करणारी कंपनी टीमलीझ सव्र्हिसेसच्या मते, चालू वर्षात आयटी कंपन्या डिजिटायझेशनवर भर देत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे.

स्टार्टअप इंडियामुळेही संधीत वाढ झाल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून देशात आता नवीन उद्योग व नव्या कंपन्या सुरू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उद्योगांचे स्वरूप सेवा पुरवठादार असे राहिले नसून उपाय पुरवठादार (सोल्युशन प्रोव्हायडर) असे झाले आहे. या नवीन बदलासाठी आयटी क्षेत्राची देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे. कंपन्यांकडून डिजिटायझेशनवर अधिक भर दिला जात असल्याने शिक्षित आणि सॉफ्टवेअर कुशल तरुणांना कामावर घेण्यास अधिक कल दिसून येतो आहे. त्यामुळे मात्र आता आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होणार आहेत. तसेच भारतातून सॉफ्टवेअरच्या निर्यातीत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. परिणामी या क्षेत्रात दीड लाख नवी पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

गतवर्षी जागतिक मंदी आणि परदेशी कंपन्यांनी आयटी क्षेत्राच्या खर्चाला लावलेली कात्री यामुळे उत्पन्नाची वाढ साडेपाच टक्के पर्यंतच राहिली. असा निष्कर्ष नेसकॉम या कंपनीने काढला आहे. चालू आर्थिक वर्षात रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होत असल्याने देशभरातील बहुतांश बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र या साठी कौशल्य विकासावर तरूणांना भर द्यावा लागणार आहे.