बोईंग कंपनी भारतात बनविणार लढाऊ विमाने

Super-Hornet
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला प्रतिसाद देऊन अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंग ही भारतात ‘एफ/ ए-१८ सुपर हॉर्नेट’ या लढाऊ विमानांचे उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनिस मिलेनबर्ग यांनी दिली.

‘एफ/ ए-१८ सुपर हॉर्नेट’ या लढाऊ विमानांच्या उत्पादन प्रकल्पासाठी आवश्यकतेनुसार भारतात काही कोटी डॉलर्सचे गुंतवणूक करण्याची कंपनीची तयारी असून ‘एफ/ ए-१८ सुपर हॉर्नेट’च्या उत्पादन प्रकल्पाकडे आपण एक मूल्यवान संधी म्हणून पाहत आहोत; असे मिलेनबर्ग यांनी सांगितले.

भारताची फ्रान्सच्या ‘राफेल’ या सुमारे २०० दशलक्ष डॉलर किंमतीच्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. भारताच्या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात बोईंग कंपनीलाही रस आहे. या शिवाय स्वीडनची साब एबी ही कंपनी आपले एक इंजिन असलेले ‘ग्रीपन’ हे लढाऊ विमान घेऊन या स्पर्धेत उतरली आहे.

Leave a Comment