जागतिक बँकेच्या वरिष्ठ संचालकपदी सरोज कुमार झा

world-bank
वॉशिंग्टन – जागतिक बँकेच्या एका महत्त्वाच्या पदावर इंडियन इस्न्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरचे विद्यार्थी राहिलेले सरोज कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यंग किम यांनी त्यांना घसरण, संघर्ष आणि हिंसा यांच्या विरुद्ध लढण्यासाठी अग्रगण्य नेतृत्त्व करण्याचे काम दिले आहे. जागतिक बँकेचे मध्य अशियातील प्रादेशिक संचालक राहिलेल्या झा यांनी बँकेमध्ये वरिष्ठ संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

Leave a Comment