‘याहू’ करणार कर्मचा-यांची कपात!

yahoo
सॅन फ्रान्सिस्को – आपल्या कर्मचा-यांच्या संख्येत सर्च इंजिन ‘याहू’ १५ टक्क्यांची कपात करणार असल्यामुळे १,६०० पेक्षा जास्त कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी याहूचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारिसा मेयर यांनी हा निर्णय घेतला आहे.

याहूच्या प्रमुख गुंतवणूकदारांनी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर व्यवस्थापनामध्ये बदल करण्यासाठी दबाव टाकला आहे. गुंतवणूकदारांचा कंपनीचे व्यवस्थापन आणि बोर्ड यांच्यावरील विश्वास कमी होत चालला आहे, असे याहूमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक करणा-या स्टारबोर्ड व्हॅल्यूने मागील महिन्यामध्ये म्हटले होते. याहूचे दुसरे सर्वात मोठे गुंतवणूकदार स्प्रिंगोलने डिसेंबर महिन्यामध्ये याहूला ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचा-यांची कपात करण्यात यावी, असे म्हटले होते. मागील तीन महिन्यामध्ये व्यवस्थापनाद्वारा अधिग्रहण करण्यावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च करण्यात आला होता.

Leave a Comment