
मुंबई : नुकताच सॅमसंगच्या बहुप्रतीक्षित ‘गॅलेक्सी एस७’ या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करण्यात आला असून येत्या २१ फेब्रुवारीला ‘गॅलेक्सी एस७’ स्मार्टफोनचे लॉन्चिंग करणार असल्याची अधिकृत माहितीही सॅमसंगकडून देण्यात आली आहे.
सॅमसंगच्या ‘गॅलेक्सी एस७’च्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!
Rethink what a phone can do. February 21. #TheNextGalaxyhttps://t.co/oCVxCmiwO8
— Samsung Mobile (@SamsungMobile) February 1, 2016
‘गॅलेक्सी एस७’च्या टीझरमध्ये फार काही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, एक तरुण गिअर व्हीआर हँडसेट लावून व्हिडीओ पाहताना दिसतो. या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा बॉक्स असून त्यावर #TheNextGalaxy असे लिहिले आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोन २१ तारखेला लॉन्च होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
‘गॅलेक्सी एस७’च्या फीचर्सबाबत सॅमसंगकडून कोणताही माहिती देण्यात न आल्यामुळे नक्की कोणते नवे फीचर्स असतील, याबाबत स्मार्टफोनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
