फेसबुकचा संस्थापक नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो?

mark
मुंबई : तुम्ही अनेक वेळेस फेसबुकचा सर्वेसर्वा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचा व्हिडीओ किंवा पोस्ट पाहिली असेल, मात्र तुम्हाला नेहमीच झुकेरबर्ग फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.

याविषयीचे रहस्य झुकेरबर्गने उघड केले आहे, आपल्या वार्डरोबचा एक फोटो झुकेरबर्गने फेसबुकवर पोस्ट केला आहे, यात सारे कपडे एकच रंगाचे आहेत. झुकेरबर्ग २०१४ मध्ये सीईओ झाले होते तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिले होते. यावर झुकरबर्ग म्हणाला होता, माझ्याजवळ एकच टीशर्ट आहे, असे नाही, तर माझ्याजवळ एकाच रंगाचे अनेक टीशर्ट आहेत. टीशर्टचा रंग सांगतो की, आपण समाजाबद्दल असलेल्या कर्तव्यांबद्दल कसा विचार करतो. तसेच टीशर्टचा रंग सारख्या लहान गोष्टीत आपण, आपला वेळ घालवत नाही, की ज्या लहान-लहान गोष्टींना जीवनात काहीच महत्व नाही.

Leave a Comment