रिलायन्सच्या स्मार्टफोनसोबत मिळणार ५० जीबी ४जी डेटा

reliance
नवी दिल्ली : रिलायन्स जियोने अवघ्या काही दिवसांपूर्वीच ४जी सेवेची सुरुवात केली आहे. मात्र, ही सेवा सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुली करण्यात आली नाही. रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना ४जी सेवा दिली जात आहे. मात्र, रिलायन्स जियोने आपल्या या सेवेसंबंधित माहिती जाहीर केली आहे.

आपल्या ४जी स्मार्टफोनचीही रिलायन्स जियोने घोषणा केली होती. LYF नावाचा हा ४जी स्मार्टफोन असेल. येत्या एप्रिल महिन्यात रिलान्स कंपनी हा नवा कोरा ४जी स्मार्टफोन लॉन्च करणार असून स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसह जबरदस्त ऑफर्सही रिलायन्सकडून देण्यात देण्याची शक्यता आहे.

याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, LYF ब्रँड स्मार्टफोनसोबत ग्राहकांना ५० जीबी ४जी डेटा मोफत दिला जाण्याची शक्यता आहे. ४जी नेटवर्कवर ५ हजार मिनिट मोफत टॉकटाईम आणि ५ हजार मेसेज ही मिळण्याची शक्यता आहे. ३० शहरात ही सुविधा फेब्रुवारीमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.

Leave a Comment