आयफोन ६एसवर भरघोस सूट!

iphone
मुंबई: काही महिन्यापूर्वीच लाँच करण्यात आलेल्या अॅपलच्या आयफोन ६एस स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली असून या स्मार्टफोनचा १२८ जीबी ग्रे वेरिएंट आता ६२,००० किंमतीला उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल २० हजारांची कपात करण्यात आली आहे. तर १६ जीबीच्या बेस मॉडेलची किंमत आता ४६,१९९ आहे.

आयफोन ६एस १२८ जीबी मॉडेल ई-शॉपिंग वेबसाईट पेटीएमवर ६२,०००रुपयांना उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये प्रोमो कोडमधून तुम्हाला १०,००० रु. कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ याआधीही आयफोन ६एस च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आल्यामुळे सेलमध्ये हा फोन २०,००० पर्यंत स्वस्त झाला होता. आयफोनच्या ब्राडं न्यू स्मार्टफोनला भारतात म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे याच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती आहे. डिसेंबर महिन्यात आयफोन ६एसच्या १२८ जीबी मॉडेलची किंमत ७५,००० रुपये होती. आयफोन ६एसमध्ये ४.७ इंच स्क्रिन आहे. यामध्ये सर्वाधिक फास्ट प्रोसेसर चिप ए९ वापरण्यात आली आहे. तर २ जीबी रॅम आहे. तसेच ६एसमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

Leave a Comment