मुलीचा पोहण्याचा फोटो झुकरबर्गने केला शेअर

mark
मुंबई : फेसबुकचा सर्वेसर्वा सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला असून मार्क मॅक्सला पोहणे शिकवताना हा फोटो असून मार्कने फेसबुकवर याविषयी हे आपल्या मुलीचे पहिल्यांदा पोहणे आहे आणि ते आपल्याला आवडल्याचे लिहिले आहे. आपल्या कुटुंबाचे फोटो मार्क आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत असतात. मार्कने मॅक्सचा जन्म झाल्यानंतर काही तासात पहिला फोटो शेअर केला होता. मार्क झुकरबर्गने आपली मुलगी मॅक्सला, स्विमिंग टँकमध्ये दोन्ही हातांनी, पाण्याच्या पातळीच्या वर धरले आहे. मॅक्सला थोडासा पाण्याचा स्पर्श होतो आहे. मॅक्स आता दोन महिन्याची झाली आहे.

Leave a Comment