तब्बल ६.७६ कोटी रुपयांचा बटाटा

potato
नवी दिल्ली : केवळ सोने, हिरे, मोती या सर्वात किंमती आणि महागड्या वस्तू असल्याचे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही आहे. जगात अशा अनेक वस्तू आहेत ज्यांच्या किंमती इतक्या महागड्या असतील याचा कधी आपण विचारही केला नसेल.

एका साधारण बटाट्याची किंमत किती रुपये असू शकते? १० रुपये? २० रुपये? जास्तीत जास्त ५० रुपये? पण नाही या बटाट्याच्या फोटोची किंमत हिरे-जवाहरपेक्षाही अधिक आहे. एका इंग्रजी वेबसाईटनुसार या बटाट्याचा फोटो तब्बल १० लाख डॉलर म्हणजेच ६.७६ कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर केविन अबोस्क यांनी हा फोटो काढला आहे. केविन यांना बटाटा अधिक आवडत असल्यामुळे त्यांनी विविध बटाट्यांचे फोटो काढले आहेत. त्यातील हा बटाट्याचा फोटो त्यांचा आवडता आहे.

Leave a Comment