
पणजी : देशातील कमीत कमी १०० रेल्वेस्थानकांवर एका वर्षात गूगलद्वारे वायफाय सुविधा उपलब्ध करुन देऊ, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. पणजीमधील भारतीय सारस्वत संमेलनाच्या एका कार्यक्रमात प्रभू यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
देशातील १०० रेल्वेस्थानकांवर वर्षभरात वायफाय : सुरेश प्रभू
वर्षभरात देशातील १०० प्रमुख रेल्वेस्थानकांवर गूगल वायफाय सुविधा उपलब्ध करु देऊ, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी कॅलिफोर्नियाच्या माऊंटेन व्ह्यूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भारतातील ४०० रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती. रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधा पुरवण्यासह प्रवाशांसाठी आणखी चांगल्या सुविधा देण्याबाबतही रेल्वेमंत्रालय प्रयत्न करत आहे, अशी माहितीही यावेळी सुरेश प्रभू यांनी दिली.
