यावर्षी पाच ग्रहणे, पण भारतात दिसणार दोनच

grahan
इंदूर- यंदाच्या वर्षात पाच ग्रहणे पाहण्याची संधी खगोलसंशोधक आणि अवकाशप्रेमींना आहे. परंतु त्यापैकी दोनच ग्रहणे भारतात दिसणार आहेत. ९ मार्चला खग्रास सूर्यग्रहण असून ईशान्येत ते अंशत: दिसणार असल्याचे उज्जैन स्थित जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्त यांनी सांगितले.

२३ मार्चला खंडग्रास चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार नाही. १८ ऑगस्टला एक खंडग्रास चंद्रग्रहण आहे तर १ सप्टेंबरला चक्राकार सूर्यग्रहण असून ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. मात्र आणखी एक खंडग्रास चंद्रग्रहण १६ सप्टेंबरला असून वर्षातील ती शेवटची अवकाशातील घटना असेल. ते भारतातील खगोलप्रेमींना पाहण्याची संधी आहे.

Leave a Comment