जगातला सर्वात छोटा नाईट/डिस्को क्लब

tele-disco
जर्मनीतील एका टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपनीने जगातील सर्वात छोटा नाईट क्लब अथवा डिस्को क्लब सुरू केला असून त्यात सिक्रेट पार्टीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या गेल्या आहेत. हा कलब इतका लोकप्रिय ठरला आहे की त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आणखी कांही क्लब लवकरच सुरू केले जाणार आहेत.

हा क्लब टेलिफोन बुथइतका छोटा आहे व त्याचे नामकरणही टेलीडिस्को असेच केले गेले आहे. यात एकावेळी दोन जण पार्टीचा आनंद लुटू शकतात. यासाठी टेलिफोन बूथप्रमाणेच नाणी टाकून बुकींग करावे लागते. सध्या असे तीन टेलिडिस्को असून त्यातील दोन बर्लीनमध्ये आहेत तर एक फिरता आहे. एखाद्या पार्टीतही हा टेलिडिस्को नेता येतो. त्यात स्मोक मशीन, लाईट इफेक्टस, डिस्को बॉल, गाण्यांसाठी टच स्क्रीन, फोटोसाठी इनबिल्ट कॅमेरा अशा सुविधा दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment