वोक्सवॅगनच्या अॅमिओचे फोटो लिक

amio
जर्मन कारमेकर वोक्सवॅगनच्या नव्या सबकॉम्पॅक्ट कार अमिओचे फोटो लिक झाले आहेत. ग्लोबल प्रिमियर २०१६ च्या पार्श्वभूमीवर ही कार दिल्ली येथील ऑटो एक्स्पो शोमध्ये सादर केली जाणार आहे. या कारचे सर्व फिचर्स समजू शकलेले नाहीत मात्र तिला पोलोचे इंजिन दिले गेले असल्याचे समजले आहे.

ही कार पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येईल. तिची किंमत ५.५ ते ८.५ लाखांच्या दरम्यान असेल असे संकेत दिले गेले आहेत. या कारला पाच स्पीड मॅन्यूअल व सात स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. बूट स्पेस मोठी आहे तसेच टेल लँप नवीन डिझाईनचे आहेत. कारची केबिनही पोलोशी साधर्म्य असलेली आहे तसेच टच स्क्रीन डिस्प्ले, सेंट्रल इन्फोटेनमेंट सिस्टीम, थ्री स्पोक स्टिअरिंग व्हील, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल अशाही सुविधा फोटोत दिसत आहेत. या कारला मारूतीच्या डिझायर, होंडाच्या अमेझशी स्पर्धा करावी लागेल.

Leave a Comment