मार्चमध्ये येणार अॅपलचा ४ इंचाचा नवीन आयफोन?

iphone
मुंबई : ‘अॅपल’चे नुकतेच आलेले आयफोन ६ किंवा आयफोन ६एस आकाराने मोठे आहेत, म्हणून तुम्ही आयफोन ५एस अपग्रेड करण्याच्या तयारीत असाल, तर थोडे थांबा. कारण आता सर्वसामान्य यूझर्ससाठी बजेट आयफोन ‘अॅपल’ कंपनी बाजारात आणण्याच्या तयारीत असून ‘मॅशेबल’ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हा आयफोन मार्च महिन्यात लॉन्च होणार आहे.

५एसई आयफोन हा ५एस आयफोनचे अपग्रेडेड व्हर्जन असून रोज गोल्ड कलरमध्ये हा आयफोन उपलब्ध असेल, अशीही माहिती मिळत आहे. आयफोनचे हे नवे वर्जन ५एस प्रमाणेच असून काही अतिरिक्त फीचर्स त्यात असतील. या बजेट फोनचे नाव ‘आयफोन ७’ असेल अशा चर्चा होत आहेत.

६४ बीट ए८ प्रोसेसर आणि १ जीबी रॅम आयफोन ५ईमध्ये आहे. त्याचबरोबर ५ इंचांच्या रेटिना डिस्प्लेसोबत एनएफसी आणि टच आयडी हे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. आयफोन ५एसच्या तुलनेत ५एसई पातळ आणि कमी वजनाचा असेल, असेही म्हटले जात आहे. आयफोन ६एस सारखी २.५डी कव्हर ग्लास हे बजेट आयफोनचे वैशिष्ट्य असेल. 8 मेगापिक्सलचा या आयफोनचा फ्रंट कॅमेरा असून ५एस प्रमाणेच ५एसईला अॅनॉडाईज्ड अॅल्युमिनियम फिनीश असेल. या नव्या आयफोनचे खास आकर्षण लाईव्ह फोटो आणि ३डी टच हे असणार आहे. या आयफोन ५एसईची किंमत आयफोन ५एसच्या किंमती एवढीच म्हणजे 30 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment