मोबाईल बँकींग मध्ये आयसीआयसीआयची गरूडझेप

kochhar
आयसीआयसीआय बँक या वर्षअखेर मोबाईल बॅकींग द्वारे केल्या जाणार्‍या आर्थिक देवघेवीत ८० हजार कोटींचा टप्पा गाठेल असे बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्या बोलत होत्या. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात वित्तीय क्षेत्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कोचर म्हणाल्या नवीन तंत्रज्ञान वापराबाबत वित्तिय क्षेत्रात नवीन प्रयोग केले जात आहेत. या तंत्रज्ञानामुळे बँकांना ग्राहकांशी संवाद साधण्याचे चांगले माध्यम मिळाले आहेच पण ग्राहकांचे बँक शाखांवरील अवलंबित्वही कमी होऊ लागले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कधीही आणि कुठेही बँकींग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याचा फायदा बँक आणि ग्राहक दोघांनाही मिळत आहे. मोबाईल बँकींगमध्ये वेगाने वाढ होते आहे आणि त्यापाठोपाठ इंटरनेट व पीओएस(पॉइंट ऑफ सेल) देवघेवही वाढते आहे. स्मार्टफोन विकासामळे डिजिटल अनुभव अधिक समृद्ध व ग्राहकोपयोगी झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाईल बँकींगमध्ये आयसीआयसीआय अग्रणी असल्याचे सांगतानाच त्या म्हणाल्या ट्विटरवर फंड ट्रान्स्फर सुरू करणारी आयसीआयसीआय ही आशियातील पहिली बँक आहे.

Leave a Comment