जाता जाता नोकराला मालकाने केले करोडपती

cr
बडोदा : गुजरातमध्ये नोकर आणि मालक यांच्यातील एका अनोख्या नात्याची प्रचिती आली आहे. बडोद्यात आपल्या नोकराला एका व्यक्तीने प्राण सोडताना करोडपती केले आहे.

गुजरातमधील एक प्रसिद्ध चित्रकार जेरामभाई पटेल हे होते. पण त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची साथ सोडली. त्यांना या काळात त्यांचा नोकर असलेल्या डाहया मारवाडीने सोबत दिली. डाहया वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांच्याकडे राहून त्यांची सेवा करत होता. तब्बल ४२ वर्षे त्यांनी पटेल यांची सेवा केली. म्हणूनच जेरामभाईंनी डाहयाच्या बँकेच्या खात्यात १ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. त्याचसोबत त्याला त्यांच्या हवेलीचाही हिस्सेदार म्हणून स्थान दिले आहे. जेरामभाई पटेल यांनी त्यांच्याजवळील अनेक शिल्प विकून एकंदर सहा कोटी रुपये जमा केले होते.

Leave a Comment