पीएफच्या व्याजदरात ८.९५ टक्के वाढीची शिफारस

epfo
नवी दिल्ली : पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याबाबतची शिफारस कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वित्तीय विभागाने केली आहे. सध्या पीएफवर मिळत असलेल्या ८.७५ टक्के व्याजदरात वाढ करुन तो ८.९५ करण्यात यावा अशी वित्तीय विभागाने शिफारस केली आहे.

ही शिफारस जर मंजूर झाली गेल्या पाच वर्षातील व्याजदरातील वाढ ही सर्वाधिक असेल. २०१०-११ मध्ये व्याजदर ९.५ टक्क्यांपर्यंत होता. या शिफारसशीला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्यापूर्वी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांच्याकडून परवानगी मिळणे आवश्यक असते. बँकांच्या कर्जावरील व्याजरात कपात तसेच गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक डिपॉझिट रेट कमी करण्याबाबत विचाराधीन असतानाच व्याजदर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला आहे. १४ जानेवारी रोजी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पीएफ फंड अथवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी व्याजदरात ५० आधार अंकाची वाढ पाहता अर्थ मंत्रालय लघु बचत योजनावरीलही व्याजदर कमी कऱण्याच्या विचारात आहे.

Leave a Comment