दोन हजार जण ताजमहलामुळे अविवाहित

taj-mahal
आग्रा- दोन हजार युवक-युवती प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहलामुळे अविवाहित असल्याचे सत्य ताजमहलाच्या मागे असणाऱ्या पाच गावात दिसून आले आहे.

या युवकांच्या चेहऱ्यावर ताजमहल हे नाव जरी उच्चारले तरी राग दिसून येतो. ताजमहालाच्या लगत असणाऱ्या अहमद बुखारी, नगला पैमा, गढ़ी बंगस, नगला, नगला तलफी या गावांमधील युवकांची ही समस्या कोणीच सोडवत नाही. नगला या गावातील अशोक या युवकाचे लग्न यामुळे दोन वेळा तुटले आहे. येथे सुरक्षेच्या आणि प्रदुषणाच्या कारणाहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या गावांमध्ये वाहने नेता येत नसल्यामुळे आपले लग्न ठरत नसल्याचे या युवकांचे म्हणणे आहे. या गावांमध्ये जाताना कडक सुरक्षा व्यवस्थेलाही सामोरे जावे लागते आणि मोठी पायपीट करावी लागते त्यामुळे या गावांमध्ये लोक मुलीला देत नाहीत.

Leave a Comment