ब्लॅकबेरी प्रिव अँड्रॉईड स्मार्टफोनचे २८ जानेवारीला लाँचिंग

blackberry
मुंबई: आपला पहिलावहिला अँड्राईड स्मार्टफोन ब्लॅकबेरी प्रिव भारतात २८ जानेवारीला ब्लॅकबेरी लाँच करणार आहे. याचे लाँचिंग नवी दिल्लीमध्ये एका इव्हेंटमध्ये होणार आहे.

या स्मार्टफोनची अमेरिकेत ६९९ डॉलर एवढी किंमत होती. भारतात ज्याची किंमत ४७,३०० रु. होते. त्यामुळे याच किंमतीच्या आसपास याची किंमत असण्याची शक्यता आहे.

ब्लॅकबेरी प्रिव स्मार्टफोनची वैशिष्ट्ये: ५.४ इंच स्क्रिन, १४४०×२५६० पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले, हेक्सा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०८चा प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, बॅटरी क्षमता ३४१० mAh एवढी आहे.

1 thought on “ब्लॅकबेरी प्रिव अँड्रॉईड स्मार्टफोनचे २८ जानेवारीला लाँचिंग”

Leave a Comment