‘झोलो’च्या ‘ब्लॅक १एक्स’च्या किंमतीत मोठी सूट

xolo
मुंबई : झोलो कंपनीने ब्लॅक १एक्स या स्मार्टफोनच्या किंमतीत सवलत देण्याची घोषणा केली असून जे नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी ही नक्कीच मोठी संधी आहे.

या स्मार्टफोनवर झोलोने तब्बल एक हजार रुपयांची सूट जाहीर केल्यामुळे आता झोलो झोलो ब्लॅक १एक्स हा स्मार्टफोन ८ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. तुम्ही या सवलतीसह हा स्मार्टफोन स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर खरेदी करु शकाल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झोलो कंपनीने ब्लॅक १एक्स हा स्मार्टफोन ९ हजार ९९९रुपयांना लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची बॅक कव्हर काचेची असून लेदर फिनिशिंग केलेली बॉडी आहे.

कसा आहे झोलोचा ब्लॅक १एक्स – यात ड्रैगनट्रेल ग्लास प्रोटेक्शनसह ५ इंचाची एचडी स्क्रीन ज्याचे रिझॉल्युशन १०८०×१९२० पिक्सेल एवढे आहे. यात ३जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात १.३ GHz ६४ बिट मीडियाटेक ऑक्टा कोर चिपसेटचा प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ४५० MHz माली-टी ७२० GPUची सुविधा देण्यात आली आहे. यात ३२जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि माइक्रोएसडी कार्डच्या मदतनीने स्टोरेज वाढवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत देण्यात आला आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस आहे. याच्या बॅटरीची क्षमता २४००mAh एवढी आहे. यात ४जी, ३जी एचएसपीए, वाय-फाय, ब्लूटूथ अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment