सॅमसंगने लाँच केला ड्यूल सिम गॅलक्सी नोट ५

samsung
मुंबई: भारतात गॅलक्सी नोट ५चे ड्यूल सिम वेरिएंट मोबाइल कंपनी सॅमसंगने लाँच केले असून सॅमसंगच्या भारतीय इ-स्टोअरमध्ये याची विक्री सुरु झाली आहे. याच्या ३२ जीबी इंटरनल मेमरी वेरिएंटची किंमत रु. ५१,००० आहे. तर नोट ५च्या सिंगल सिमच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ३२ जीबी वेरिएंटची किंमत ४७,९०० रुपये तर ६४ जीबी वेरिएंटची किंमत ५३,९०० रुपये आहे. २०१५च्या सप्टेंबर महिन्यात नोट ५ सिंगल सिम ३२ जीबी ५३,९०० रु. आणि ६४ जीबी वेरिंएट ५९,९०० रुपयात लाँच झाला होता.

काय आहेत सॅमसंग गॅलक्सी नोट ५च्या ड्यूल सिम स्मार्टफोनचे फीचर्स: याचा डिस्प्ले ५.७ इंच QHD सुपर एमोल्ड १४४०×२५६० पिक्सल रिझोल्यूशनचा आहे. यात ७४२० प्रोसेसर क्वॉड कोअर, १.५GHz कोर्टेक्स, ए५३ क्वॉड कोअर २.१GHz कोर्टेक्स ए५७ त्याचबरोबर यात T760MP8 GPU आणि ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याचे ऑपरेटिंग सिस्टम ५.१ अँड्राईड लॉलिपॉप बेस आहे. याचा रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता ३०००mAh एवढी आहे. याला ५ कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे.

Leave a Comment