‘गोल्डन बाबा’ अवतरले अर्ध कुंभ मेळ्यात

golden-baba
हरिद्वार : मोठ्या उत्साहात अर्ध कुंभ मेळ्याला सुरूवात झाली असून या अर्ध कुंभ मेळ्यात गोल्डन बाबा हे सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय आहेत. घाटावार भाविकांची झुंबड ३ कोटींचे सोन अंगावर घालणाऱ्या या गोल्डन बाबांना पाहण्यासाठी उडत आहे.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा भक्तगणांसह उतरले आणि त्यांना पाहून अनेकांचे डोळेच दिपले. या बाबांच्या अंगावर तब्बल १५. ५ किलोचे सोन्याचे दागिने आहे. या सोन्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. त्यांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याचे लॉकेट असून त्यांनी तब्बल २७ लाखांचे एक हिऱ्याचे घड्याळही घातले आहे. जसे सोने अतिशय मौल्यवान असटे, तसेच आमचे बाबाही आमच्यासाठी अमूल्य असल्याचे सांगत बाबांचे भक्तगण त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचे एकप्रकारे समर्थन करतात.

Leave a Comment