
नवी दिल्ली – आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या कॉल रेटमध्ये बीएसएनएल या सरकारी दुरसंचार कंपनीने ८० टक्के घट केली असून हा नवीन दर आजपासून लागू करण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वी ही योजना फक्त नव्या प्रीपेड ग्राहकांसाठी लागू करत ८० टक्के कपात केली होती. मात्र आता या योजनेमध्ये विस्तार करत सर्व ग्राहकांसाठी ही योजना लागू करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही कपात प्रतिमिनिट आणि प्रति सेकंद कॉलरेट असणा-या ग्राहकांसाठी आहे.
