अमर्यादित हायस्पीड ब्रॉडबँड डेटा स्वस्त दरात देणार स्पेक्ट्रानेट

spectranet
नवी दिल्ली – १०० एमबीपीएसचा वेग आणि अमर्यादित डेटासह जवळपास १२०० रुपये प्रति महिनाच्या दरामध्ये फिक्स्ड लाईन ब्रॉडब्राँड कनेक्शन ग्राहकांना उपलब्ध करण्याची योजना इंटरनेट सेवा देणा-या स्पेक्ट्रानेटने तयार केली आहे.

भारतामध्ये प्रत्येक शहराला जागतिक स्तरावरील ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्याचे आमचे लक्ष्य असून आमची कंपनी सध्या नफ्यामध्ये नाही. आम्ही देशातील नागरिकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना अमर्यादित डेटा डाउनलोडसह १०० एमबीपीएसचा वेग उपलब्ध करणार आहेत, असे ब्रॉडब्रँड स्पेक्ट्रानेटचे सीईओ उदित महरोत्रा यांनी माहिती देताना सांगितले आहे. पूर्ण देशात अशी योजना सुरू करण्याची योजना असून, त्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

Leave a Comment