नोबेल विजेत्याचा इंडियन सायन्स काँग्रेसला उपस्थित राहण्यास नकार

venkatraman
चंदीगढ – ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ला उपस्थित राहण्याचे नोबेल पारितोषिक विजेता व्ही. वेंकटरामन रामकृष्णन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने नाकारले असून त्यांनी सदर संस्था एक ‘सर्कस’ असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या विज्ञान काँग्रेसच्या दिवसभराच्या सत्रात उपस्थिती दर्शविली होती. त्या वेळची चर्चा विज्ञानाला अत्यंत कमी महत्व देऊन करण्यात आल्याचे त्या काँगेसला उपस्थित राहणे निरर्थक असल्याचे त्यांनी एका मुलाखतीतबोलून दाखविले. म्हैसूर येथे सध्या विज्ञान विषयक वार्षिक काँग्रेसचे आयोजन होत आहे.

विज्ञानाबरोबर राजकारण व धार्मिक तत्वज्ञानांचे मिश्रण करण्यास गेल्या वर्षी त्यांनी विरोध केला होता. तामिळनाडूत जन्मलेले वेंकटरामन केंब्रिज विद्यापीठाचे ‘स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट’ असून त्यांना २००९ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.