फॅराडेची फ्यूचर रेस कार सादर

ffo1
इलेक्ट्रीक कार उत्पादन क्षेत्रात उतरलेल्या फॅरेडे फ्यूचर या नव्या कंपनीने त्यांची कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक रेस कार एफएफ झिरो वन लास वेगासमध्ये प्रथमच जगासमोर आणली आहे. ० ते १०० किमीचा वेग ३ सेकंदापेक्षाही कमी वेळात ही कार गाठेल आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२० किमीपेक्षाही जास्त.

या कारमध्ये चार क्वॉडकोर मोटर्स लावल्या गेल्या असून त्यापासून १ हजार हॉर्स पॉवर ताकद निर्माण होते. या कारसाठी इनोव्हेटिव्ह कार्बन फायबर व बाकीचे वजनाला हलके मटेरियल वापरले गेले आहे. यात एकाच व्यकतीची बसण्याची सोय आहे म्हणजे ही सिंगल सीटर कार आहे.तसेच या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टेड रिमोट व्हेईकल नावाचे अत्याधुनिक फिचर दिले गेले आहे. कार तापू नये म्हणून एअरोटनेल डिझाईनच्या सहाय्याने बॅटरी कूलींग व्यवस्था केली गेली आहे. तसेच अॅडव्हान्स्ड हाय परफॉर्मन्स रेसिंग सस्पेन्शनही दिले गेले आहे. कारची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Comment